नवी दिल्ली - सरकारने कामगारांना गावी स्थलांतरासाठी परवानगी दिल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातून अनेक कामगारांनी प्रवासाला सुरुवात केली आहे. रविवारी केरळमधूनही तब्बल 5 हजार 700 बिहारी कामगारांनी वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवरुन आपल्या राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या पकडल्या. यामध्ये 2 रेल्वे इर्नाकुलम येथून बारुनी आणि मुझफ्फरपूरसाठी तर एक थ्रिसूरपासून दरबंगापर्यंत असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
5 हजार 700 बिहारी कामगार परतणार स्वगृही, केरळमधून 5 रेल्वे रवाना - बिहारी कामगार परतणार स्वगृही
रविवारी केरळमधूनही तब्बल 5 हजार 700 बिहारी कामगारांनी वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवरुन आपल्या राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या पकडल्या. प्रत्येक रेल्वे गाडीत केवळ 1 हजार 140 प्रवासी प्रवास करु शकतात. सोशल डिस्टन्स आणि शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली.
याशिवाय, कोझीकोड आणि कन्नूरमधून काथिहार आणि सहरसासाठी 2 गाड्या गेल्या. प्रत्येक रेल्वे गाडीत केवळ 1 हजार 140 प्रवासी प्रवास करु शकतात. सोशल डिस्टन्स आणि शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली. यासोबतच सुरक्षितता म्हणून प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर आणि साबणांचे वाटपही करण्यात आले.
याशिवाय केरळमध्ये अडकलेल्या ओडिशा आणि झारखंडमधील कामगारांनाही 2 मे रोजी वेगवेगळ्या स्थानकांवरुन त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले होते. यावेळी झारखंडमधील हटिया येथे सुमारे १ हजार 100 कामगार गेले. तर, शुक्रवारी ओडिशासाठी निघालेल्या रेल्वेतून तब्बल 1 हजार 110 कामगारांनी प्रवास केला.