महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंड: चाईबासा येथे नक्षलवादी हल्ल्यात ५ पोलिसांना वीरमरण - झारखंड

नक्षलवाद्यांनी कुकडु साप्ताहिक हाट येथे ५ ते ६ पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये ५ पोलिसांना जागीच वीरमरण आले.

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात वीरमरण आलेले जवान

By

Published : Jun 14, 2019, 8:08 PM IST

Updated : Jun 14, 2019, 8:51 PM IST

सरायकेला - झारखंड येथे सरायकेला जिल्ह्यातील चाईबासा तिरुलडीह पोलीस ठाणे क्षेत्रात मोठा नक्षलवादी हल्ला झाला. नक्षलवाद्यांनी कुकडु साप्ताहिक हाट येथे ५ ते ६ पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये ५ पोलिसांना जागीच वीरमरण आले. तर, या घटनेनंतर १ पोलीस घटनास्थळावरुन गायब आहे.

वीरमरण आलेले पोलीस जवान

वीरमरण आलेल्या जवानांमध्ये २ एएसआय आणि ३ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या भागात महाराज प्रामाणिक दस्ता आणि पीएलएफआयचे नक्षलवादी सक्रीय आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत एकही मोठा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही.

Last Updated : Jun 14, 2019, 8:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details