महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटक संकट : काँग्रेसच्या पाच आमदारांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा - BS Yeddyurappa

काँग्रेसच्या पाच आमदारांनी उच्च न्यायालयाचा दरावाजा ठोठावला आहे. विधानसभा सभापती रमेश कुमार हे राजीनाम्याचा स्वीकार करत नसल्याचे त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

कर्नाटक संकट : काँग्रेसच्या पाच आमदारांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

By

Published : Jul 13, 2019, 6:15 PM IST

बंगळुरू - कर्नाटकात सध्या राजकीय नाट्य सुरू आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. विधानसभा सभापती रमेश कुमार हे राजीनाम्याचा स्वीकार करत नसल्याचे त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.


काँग्रेसचे 5 आमदार विधानसभा सभापती यांच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत. आम्ही विधानसभा नियम 202 नुसार राजीनामा दिला आहे. तरी देखील आमचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याचे त्यांनी आपल्या याचिकमध्ये म्हटले आहे. यामध्ये के. सुधाकर, रोशन बेग, एमटीबी नागराज , मुनिरत्न आणि आनंद सिंह यांचा समावेश आहे.


याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी देखील आपण अविश्वास ठरावासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. यासाठी आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहू असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान बंडखोर आमदारांनी त्याचे राजीनामे परत घ्यावे यासाठी जेडीस-काँग्रेस प्रयत्न करत आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या अविवश्वास ठरावानंतर राज्यात कुणाचे सरकार होते. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details