महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 5 दहशतवादी ठार - शोपिया जिल्हा चकमक बातमी

शोधमोहीम सुरू असताना पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनीही गोळीबार केला.

दहशतवादी ठार
दहशतवादी ठार

By

Published : Jun 7, 2020, 7:56 PM IST

श्रीनगर -जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यातील रेबन परिसरात शोधमोहीम होती घेतली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत 5 जण ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शोधमोहीम सुरू असताना पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात पाच दहशतवादी ठार झाले. संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनीही या कारवाईची माहिती दिली.

सुदैवाने चकमकीत एकही जवान जखमी झाला नाही. दहशतवाद्यांची नावे आणि ते कोणत्या दहशतवादी संघटनेत होते, यांची माहिती मिळविण्याचे काम सुरू असून कारवाई अजून सुरूच असल्याचे कर्नल कालिया म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details