टीकमगढ (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील खरगापूर येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्य गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले आहेत. यामध्ये चार वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. प्रकरणाविषयी संदिग्धता असून या सर्वांची हत्या झाली असावी, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. वार्ड नंबर 8 येथे ही घटना घडली.
मध्यप्रदेश : ४ वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील ५ जण आढळले गळफास लावलेल्या स्थितीत - मध्य प्रदेश ५ जण मृत्यू
मध्य प्रदेशातील खरगापूर येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्य गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले आहेत. यामध्ये चार वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्य एकाच वेळी संशयास्पदरित्या मृत आढळल्याची सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
खरगापूर येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्य एकाच वेळी संशयास्पदरीत्या मृत आढळल्याची सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खरगापूरनगर येथील पोलीस अधीक्षकही घटनास्थळी पोहोचले होते. धर्मदास सोनी (वय 62), पुणे सोनी (वय 55), मनोहर सोनी (वय 27), सोनम सोनी (वय 25), सानिध्य (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. यांच्यापैकी धर्मदास हे सेवानिवृत्त असून ते पशुवैद्यकीय रुग्णालयात नोकरी करत होते.
हे प्रकरण अद्याप संदिग्ध असून पोलीस अधिक तपास करत आहेत.