लखनऊ(उत्तर प्रदेश)- राज्यात विविध ठिकाणी बुधवारी वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारने याबाबत माहिती दिली आहे. मृतामंध्ये अलाहाबाद, अयोध्या, माऊ, बालिया, बस्ती येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. बस्ती जिल्ह्यातील एक जण जखमी झाला आहे.
उत्तर प्रदेशात वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू - उत्तर प्रदेशात वीज कोसळल्याने 5 ठार
उत्तर प्रदेश राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
उत्तर प्रदेशात वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्यामुळे दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबाना 4 लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जखमी व्यक्तींना वैद्यकीय सहाय्य पुरवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यात वीज कोसळून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 व्यक्ती आणि 46 प्राणी जखमी झाले होते.