लखनऊ -उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात विषारी वायूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विहिरीत पडलेल्या वासराला वाचविण्यासाठी पाच जण आत उतरले होते. मात्र, विहिरीत विषारी वायू असल्याने त्यांना श्वासोच्छवासास त्रास होऊ लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना आज (मंगवारी) दुपारी घडली.
विहिरीत पडलेल्या वासराला वाचविण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना - विषारी वायूने मृत्यू
विहिरीत विषारी वायू असल्याने त्यांना श्वासोच्छवासास त्रास होऊ लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना आज (मंगवारी) दुपारी घडली.
घटनास्थळी पोलीस
पाचही जणांना विहिरीतून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आल्यानंतर तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी पाचही जणांना तपासून मृत घोषित केले. छोटू, रिंकू, विष्णू, वैभव आणि मन्नू अशी मृतांची नावे आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.