सुकमा (छत्तीसगढ) -येथील ताडमेटला परिसरात झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या कोब्रा २०६ बटालियनचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांना वीरमरण आले आहे. ते मूळचे नाशिकमधील आहेत. त्यांना माना येथील चौथ्या बटालियनच्या परेड ग्राउंडवर मानवंदना दिली जाईल. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच सीअआरपीएफचे अधिकारी यावेळी उपस्थित असतील. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे. आईडी स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. येथील ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी एक आयईडी स्फोट केला. या स्फोटात कोब्रा 206 बटालियनचे 10 जवान जखमी झाले आहेत. त्यातील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे.
नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण
रायपूर येथील रुग्णालयात भालेराव यांचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव रायपूरवरून विमानाने मुंबई येथे आणले जाईल. तेथून वाहनाने अथवा हेलिकाॅप्टरने पार्थिव नाशिकला आणून त्यांच्या कुटुंबियांकडे सपुर्द केले जाईल. या ठिकाणी लष्करी इतमामात मानवंदना देऊन अंतिम संस्कार केले जातील. २०१० सालापासून भालेराव सीआरपीएफच्या २०६ कोब्रा बटालियनमध्ये कर्तव्य बजावत होते. भालेराव हे इंदिरानगर परिसरात राहत होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
यापूर्वीही केला होता नक्षल्यांनी हल्ला