महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीप येथे अडकलेल्या २० मच्छीमारांची केली सुटका - सुटका

भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीप येथे अडकलेल्या मच्छीमारांची सुटका केली.

भारतीय तटरक्षक दलाची नौका

By

Published : Jun 4, 2019, 7:56 PM IST

कन्याकुमारी- भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीप येथे अडकलेल्या मच्छीमारांची सुटका केली. बुधवारी तटरक्षक दलाने आयसीजीएस विक्रम या नौकेद्वारे २ बोटी आणि २० मच्छीमारांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

कन्याकुमारी येथे काल रात्री (मंगळवार) १० वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास मरिन पोलीस ठाण्यात मदतीसाठी फोन करण्यात आला होता. इंजिन बंद पडल्यामुळे स्टार ऑफ सी-१ आणि स्टार ऑफ सी-२ या मच्छीमार बोटी लक्षद्वीप येथे अडकून पडल्याची माहिती यावेळी देण्यात आली होती. सी-१ वर ९ आणि सी-२ बोटीवर ११ मच्छीमार असल्याचे सांगण्यात आले होते.

भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी यावर लगेच कारवाई करताना आयसीजीएस विक्रम या नौकेची दिशा बदलत तिला बचावासाठी पाठवले. यावेळी घटनास्थळी पोहोचत तटरक्षक दलाच्या जवानांनी बोटीची चाचणी केली. बोटीच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने बोट बंद पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोन्ही बोटींना टो करत अंड्रोथ या ठिकाणी आज (बुधवार) दुपारपर्यंत पोहचवले.

ABOUT THE AUTHOR

...view details