कोची -पुरुषांचे वर्चस्व असलेल्या भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पायलट म्हणून शिवांगी स्वरुप यांचा समावेश करण्यात आला आहे. सब लेफ्टनंट शिवांगी या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत.
भारतीय नौदलात रचला इतिहास, शिवांगी स्वरुप बनल्या पहिल्या महिला पायलट
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पायलट म्हणून शिवांगी स्वरुप यांचा समावेश करण्यात आला आहे. सब लेफ्टनंट शिवांगी या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत.
बिहारमधील मुझफ्फरापूर तेथे जन्मलेल्या शिवांगी कोची येथील नौदलाच्या तळावर सध्या कार्यरत आहेत. नौदल दिनाच्या आधीच दोन दिवस आधी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मी या क्षणाची कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. माझ्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे, अशी भावना शिवांगी यांनी व्यक्त केली.
नौदलात महिलांना पायलट म्हणून घेण्यासाठी २०१५ मध्येच मंजुरी देण्यात आली होती. डोर्निअर सर्विलांस हे विमान शिवांगी चालवणार आहेत. या विमानामध्ये अॅडव्हान्स सर्व्हिलान्स, रडार, नेटवर्किंग व इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसवलेले असतात. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.