महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात, अर्थसंकल्पासह तिहेरी तलाक विधेयकावर होणार महत्वपूर्ण चर्चा - modi

२६ जुलैपर्यत चालणाऱ्या या अधिवेशनात ३० बैठका होतील. ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.

लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात

By

Published : Jun 17, 2019, 8:37 AM IST

नवी दिल्ली- सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आज सुरुवात होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पहिलेच अधिवेशन असून या अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प आणि तिहेरी तलाक सारखी महत्वाची विधेयके मांडली जाणार आहेत.

नवीन लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक आयोजीत केली होती. यावेळी त्यांनी लोकसभेत निवडूण आलेल्या नवीन सदस्यांचे स्वागत केले. तसेच संसदेच्या या कनिष्ठ सदनाचे कामकाज नवीन उत्साह आणि नवविचारांनी सुरू व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेसने सरकारपुढे बेरोजगारी, शेतकरी समस्या, दुष्काळ आणि माध्यमांचे स्वातंत्र्य आदि मुद्दे मांडले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणुका घेण्याचीही विरोधकांकडून मागणी करण्यात आली.

लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात सुरुवातीचे दोन दिवस लोकसभेच्या नवनिर्वाचीत सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली जाणार आहे. लोकसभेचे काळजीवाहू अध्यक्ष वीरेंद्र कुमार हे सदस्यांना शपथ देतील. लोकसभा अध्यक्षपदाची निवड १९ जूनला केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. २६ जुलैपर्यत चालणाऱ्या या अधिवेशनात ३० बैठका होतील. ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details