श्रीगंगानगर -जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 हटवण्याच्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयामुळे अनेक मार्ग खुले झाले आहेत. या निर्णयामुळे केवळ जम्मू-काश्मीरला जाणेच शक्य होणार नाही तर, तेथे राहणेही शक्य होणार आहे. आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ ए हटवण्याचे पाऊल मोदी सरकारने उचलल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. याचेच पहिले उदाहरण जम्मूची कन्या श्रीगंगानगरची सून बनल्याने पहायला मिळत आहे.
काश्मीरमधील तरुणींचे भारताच्या इतर भागातील तरुणांशी विवाहबंध जुळल्यामुळे काश्मीर आणि इतर ठिकाणच्या संस्कृतींना एकमेकांच्या सुरात सूर मिसळण्याची संधी मिळणार आहे.
प्रेमाच्या आड येत होते आर्टिकल 370... हटवल्यानंतर झाले लग्न
श्रीगंगानगर येथील तरुणाची जम्मू-काश्मीरच्या तरुणीशी दिल्लीत ओळख झाली. आर्टिकल 370 मुळे मागील २ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंधांचे विवाहात परिवर्तन होण्यास अडथळा येत होता. आता एक देश एक संविधान झाल्यानंतर दोन प्रेमींमधील दुरावा संपला आहे. आर्टिकल 370 आणि 35 ए मुळे येणाऱ्या समस्या आता संपल्या आहेत. अक्षय अरोरा आणि कामिनी राजपूत असे या नवविवाहित तरुण-तरुणीचे नाव आहे.