नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारतात येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प याही भारत दौऱ्यावर येत आहेत. मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीच्या सरकारी शाळेतील 'हॅप्पीनेस करिकुलम'चा वर्ग पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प मोती बागेतील सर्वोदय स्कूलमध्ये जाणार आहेत. येथे त्या 'हॅप्पीनेस' वर्गांची माहिती घेतील.