महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एअरलिफ्ट.. इराणमध्ये अडकलेल्या ५८ नागरिकांना घेऊन वायूसेनेचे विमान भारतात दाखल - भारतीय वायू सेना इराण ऑपरेशन

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने 'सी-१७ ग्लोबमास्टर' हे विमान पाठवले होते. सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ते तेहरानमध्ये पोहचले होते. आज पहाटे तेहरानवरून भारतात येण्यासाठी विमानाने उड्डाण केले होते.

Indian pilgrims being brought back from Iran
भारतीय नागरिक तेहराणवरून निघताना

By

Published : Mar 10, 2020, 9:50 AM IST

तेहराण - इराणमध्ये अडकलेल्या ५८ नागरिकांचा पहिला गट भारतामध्ये दाखल झाला आहे. इराणची राजधानी तेहराण येथून भारतीय वायू सेनेचे 'सी-१७ ग्लोबमास्टर' हे विमान निघाले होते. उत्तरप्रदेशातील गाझीयाबाद मधील हिंदोन वायू सेनेच्या तळावर विमान दाखल झाले आहे.

थोड्याच वेळात नागरिकांना घेवून विमान भारतात दाखल होईल, अशी माहीती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. त्यानुसार ५८ भाविकांना घेवून विमान भारतात दाखल झाले आहे. 'इराणमधील भारतीय वैद्यकिय पथक आणि दुतावासाचे कठीण परिस्थितीत काम करत असल्याबद्दल धन्यवाद. भारतीय वायूसेनेचे आणि इराणच्या प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. इराणध्ये अडकलेल्या इतर भारतीयांना माघारी आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे ट्विट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे.

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने 'सी-१७ ग्लोबमास्टर' हे विमान पाठवले होते. सोमवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास ते तेहरानमध्ये पोहचले होते. आज पहाटे तेहरानवरून विमान माघारी निघाले आहे.

इराणमध्ये कोरोना विषाणूच्या दहशतीखाली सुमारे १,२०० भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि भाविकांचा समावेश आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार इराणच्या संपर्कात आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मागील गुरूवारी संसदेत सांगितले होते. यासोबतच ते म्हणाले होते, की इराण सरकारने परवानगी दिल्यास भारतीयांना परत आणण्याआधी इराणमध्येच त्यांची तपासणी करण्यासाठी केंद्र उभारण्यात येईल.

कोरोना विषाणू जगभर पसरल्यानंतर, चीनमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने दोन मोहिमा राबवल्या होत्या. याद्वारे सुमारे ७६७ भारतीयांना चीनमधून परत आणण्यात आले. या सर्वांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details