नवी दिल्ली -राजधानी दिल्लीत अनलॉक 1.0 नंतर गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. उत्तर दिल्लीतील सराय रोहिल्ला पोलीस ठाण्याच्या इंद्रलोक चौकी येथे बुधवारी रात्री गुंडांनी केलेल्या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. गुंडानी पोलिसांवर हल्ला करत दगडफेक केली आणि जोरदार गोळीबार केला. याच्या बचावात पोलिसांनी देखील दोन राउंड फायरींग केली.
दिल्लीत पोलीस आणि गुंडांमध्ये हाणामारी.. व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद हेही वाचा...'कोरोना महामारीला संधीमध्ये बदलून देशाला आत्मनिर्भर बनवूया'
अशी झाली वादाला सुरूवात...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अखलाक नावाची व्यक्ती इंद्रलोक पोलिस चौकीवर आला होता. त्याने, सादकीन आणि त्याच्या भावांशी भांडण झाल्याचे सांगितले. सादकीनने त्याला मारहाण करत लूटमार केल्याचे त्याने सांगितले.
या तक्रारीवरून पोलिसांनी सादकीन आणि त्याच्या भावाला चौकीवर बोलावले. जेव्हा ते पोलीस चौकीत आले, तेव्हा पोलिसांसोबत बातचितनंतर पोलिसांवरच संताप. त्यांनी पोलिसांवरच जोरदार हल्ला चढवला. नावेद नावाच्या एका व्यक्तीने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर स्वसंरक्षणासाठी चौकी प्रभारी पंकज यांनीही आपल्या अधिकृत पिस्तुलातून 2 राउंड गोळीबार केला.
यातील जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.