महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मेणबत्ती कारखान्यात आग लागून सात ठार; दिल्लीमधील घटना.. - Delhi candle factory fire

मोदीनगरच्या बरखवा गावामध्ये ही दुर्घटना घडली. या कारखान्यात गावातील लोकच काम करतात. कारखान्यात कोणतातरी ज्वलनशील पदार्थ होता, ज्यावर ठिणगी पडून ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे...

Fire in Ghaziabad candle factory seven dead
मेणबत्ती कारखान्यात आग लागून सात ठार; दिल्लीमधील घटना..

By

Published : Jul 5, 2020, 6:11 PM IST

नवी दिल्ली :गाझियाबादच्या मोदीनगर भागामध्ये असलेल्या मेणबत्ती कारखान्यात आग लागून सात लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात १२हून अधिक कामगार उपस्थित होते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मोदीनगरच्या बरखवा गावामध्ये ही दुर्घटना घडली. या कारखान्यात गावातील लोकच काम करतात. कारखान्यात कोणतातरी ज्वलनशील पदार्थ होता, ज्यावर ठिणगी पडून ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या कारखान्यामध्ये साध्या मेणबत्त्या, तसेच वाढदिवसासाठी वापरण्यात येणाऱ्या मेणबत्त्याही बनवण्यात येत होत्या. कच्चा माल म्हणून पोटॅश गंधकाचा वापरही केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे.

मेणबत्ती कारखान्यात आग लागून सात ठार; दिल्लीमधील घटना..

या घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या सुमारे १२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, तसेच काही रुग्णवाहिकादेखील पोहोचल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हेही वाचा :दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरचे उपराज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details