गांधीनगर : सूरतच्या हजीरामधील ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) टर्मिनलमध्ये आज पहाटे तीन भीषण स्फोट झाले. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास हे स्फोट झाले. ही आग आटोक्यात आणण्यात यश आले असून, यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
सूरतच्या हजीरामधील ओएनजीसी टर्मिनलमध्ये भीषण स्फोट; आग आटोक्यात, जीवीतहानी नाही - सूरत ऑईल कंपनी आग
टर्मिनलजवळ असलेल्या गॅस पाईपलाईनमधून होत असलेल्या गळतीमुळे आग लागून स्फोट झाल्याची माहिती सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दिली.
सूरतच्या हजीरामधील ओएनजीसी टर्मिनलमध्ये भीषण स्फोट
मुंबई हायच्या हायड्रोकार्बन गॅस पाईपलाईमध्ये गळती सुरू होती. त्यामुळे आग लागून हे स्फोट झाले. आगीची माहिती मिळताच पाईपलाईनमधील गॅस सप्लाय बंद करण्यात आला होता. टर्मिनलजवळ असलेल्या गॅस पाईपलाईनमधून होत असलेल्या गळतीमुळे आग लागून हे स्फोट झाल्याची माहिती सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दिली.
Last Updated : Sep 24, 2020, 7:45 AM IST