नवी दिल्ली - शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बवाना औद्योगिक क्षेत्रामधील एका कागद कारखान्यामध्ये आग लागली होती. आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास ही आग लागल्याचे समोर आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दिल्लीच्या बवानामधील कागद कारखान्याला आग; जीवितहानी नाही..
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण आणण्यात आले. दिल्ली अग्निशामक दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही, वा कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण आणण्यात आले. दिल्ली अग्निशामक दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही, वा कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली, आणि साधारणपणे किती रुपयांचे नुकसान यामध्ये झाले हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे गर्ग यांनी सांगितले.
हेही वाचा :घनसावंगीत धावत्या हायवाने घेतला पेट; चालकाने प्रंसगावधान राखत स्वत:चा केला बचाव