गांधीनगर- गुजरातच्या सूरतमधील एका कापड बाजारामध्ये भीषण आग लागली होती. रघुवीर टेक्सटाईल मार्केट असे या कापड बाजाराचे नाव आहे. ही आग आता नियंत्रणात आली असून, कूलींग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
रघुवीर टेक्सटाईल मार्केटच्या इमारतीमधील तेराव्या आणि चौदाव्या मजल्याला आग लागली होती. एका दुकानाला लागलेली आग पुढे दुसऱ्या दुकानाला लागत गेली. कापड दुकाने असल्यामुळे आग अधिक वेगाने पसरत होती.
सूरतमधील टेक्सटाईल मार्केटच्या इमारतीला भीषण आग..
ही आग इतकी मोठी होती, की त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्नीशामक दलाच्या साठ गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. या आगीमध्ये कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच आगीचे नेमके कारणही अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत. या आगीमध्ये एकूण २५० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा : मंगळुरूमध्ये सापडलेल्या 'त्या' बॅगमधील स्फोटके केली नष्ट!