हैदराबाद - तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील बोलाराम औद्योगिक परिसरात एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली. विंध्या ऑर्गेनिक असे कंपनीचे नाव आहे. कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट झाल्यानंतर आग पसरली. यावेळी कंपनीत अनेक कामगार काम करत होते.
तेलंगणातील विंध्या ऑर्गेनिक कंपनीत स्फोट, आठ कामगार जखमी - विंध्या ऑर्गेनिक कंपनीत स्फोट
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील बोलाराम औद्योगिक परिसरात एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली. विंध्या ऑर्गेनिक असे या कंपनीचे नाव आहे.

कंपनीत आग
कंपनीत स्फोट
आठ कामगार जखमी
स्फोट झाल्यानंतर काही कामगार कंपनीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. तर काही आत अडकून राहिले. या घटनेत आठ कामगार जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर परिसरात धूर पसरला असून बचावकार्यात अडथळे येत आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही.