नवी दिल्ली : सरकारने काही दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलने सुरुच आहेत. सोमवारी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचे याबाबत आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला आम आदमी पक्षाने ही पाठिंबा दिला होता. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षातील अन्य नेत्यांनीही या आंदोलनाला हजेरी लावली होती.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा..
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह संजय सिंह, गोपाल राय, सुशील गुप्ता आणि भगवंत मान अशा अनेक नेत्यांनी या आंदोलनाला हजेरी लावली. यांच्यासोबत पंजाबमधील काही नेत्यांनीही आंदोलकांना संबोधित केले. यादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. यानंतर आंदोलकांनी जेव्हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी बऱ्याच आंदोलकांना ताब्यात घेतले.