लखनौ -परदेशी नागरिकांना लपवून ठेवल्यामुळे उत्तरप्रदेश पोलिसांनी काही मौलवींवर गुन्हा दाखल केला आहे. 23 परदेशी नागरिकांना या मौलवींनी लपवून ठेवले होते. याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्याची प्रक्रिया भारतीय दुतावासाने सुरू केली आहे.
परदेशी नागरिकांना लपवून ठेवल्याप्रकरणी उत्तरप्रदेशात मौलवींवर गुन्हा दाखल - corona update
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच परदेशी नागरिकांना उत्तर प्रदेशातील मौलवींनी दडवून ठेवले होते.
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे विविध राज्यांमध्ये उघडकीस आले आहे. अशातच परदेशी नागरिकांना उत्तरप्रदेशातील मौलवींनी दडवून ठेवले होते. संपूर्ण भारतात संचारबंदी असून परेदशी नागरिकांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परदेशी नागरिकांना लपून राहण्यास सहकार्य केल्याप्रकरणी मौलवींवर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या देशांच्या दुतावासांशी चर्चा करुन त्यांना माघारी पाठविण्यात येणार आहे. पोलिसांनी यासंबधीची माहिती भारतीय दुतावासाला पुरविली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या परदेशी नागरिकांमुळे भारतीय नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाले आहे. व्हिसा नियमानुसार या नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.