पाटना- पर्यटन व्हिसावर भारत आले मात्र, धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे 17 परदेशी नागरिकांना तुरुंगवास झाला आहे. व्हिसा नियम मोडल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व नागरिक किरगिझीस्तान देशाचे आहेत.
व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 17 परदेशी नागरिकांना तुरुंगवास - दिल्ली तबलिगी
हे सर्व नागरिक भारतामध्ये पर्यटन व्हिसा घेऊन आले होते. मात्र, त्यांनी देशात धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली.
23 मार्चला त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. पाटना पोलीस अधिक्षकांनी याबबातची माहिती दिली आहे. हे सर्व नागरिक भारतामध्ये पर्यटन व्हिसा घेऊन आले होते. मात्र, त्यांनी देशात धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली. हे व्हिसा नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजधानी दिल्लीमध्ये मार्च महिन्यात तबलिगी जमात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परदेशातील अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती. यामध्ये अनेक कोरोनाग्रस्त होते. त्यामुळे भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्य़ाने वाढली आहे. नियमांचे उल्लंघन करून भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.