भोपाळ - राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय सिंग यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा व्हायरल कथित बनावट व्हीडिओ ट्विटरवरून शेअर केला होता. भोपाळ गुन्हे शाखेने दिग्विजय सिंग यांच्यासोबतच व्हीडिओ रिट्विट करणाऱ्यांवरही एफआयआर दाखल केला आहे.
बनावट व्हीडिओ शेअर केल्याप्रकरणी दिग्विजय सिंगविरूद्ध एफआयआर - शिवराजसिंह चौहान
दिग्विजय सिंग यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा व्हायरल कथित बनावट व्हीडिओ ट्विटरवरून शेअर केला होता. त्यावर भोपाळ गुन्हे शाखेने दिग्विजय सिंग यांच्यासोबतच व्हीडीओ रिट्विट करणाऱ्यांवरही एफआयआर दाखल केला आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा जानेवारी महिन्यातील हा व्हीडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. मूळ व्हीडिओमध्ये काही बदल करून तो व्हायरल करण्यात आला होता. हा कथित बनावट व्हीडिओ रविवारी दिग्विजय सिंग यांच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर 11 जणांनी तो रिट्विट केला. त्या सर्वांवर देखील एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रकरण वाढल्यांतर व्हीडिओ हटवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत होता. जे लोक हा व्हीडिओ शेअर करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवराजसिंग चौहान यांनी दिला होता. हा व्हीडिओ दिग्विजय सिंग यांनी शेअर केल्यानंतर भाजपाकडून तक्रार दाखल करण्यात आली.