नवी दिल्ली - जर तुम्ही आधारकार्ड बरोबर पॅन लिंक केले नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ३१ मार्च २०२० पर्यंत नागरिकांना आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०१९ यासाठी शेवटची तारीख होती. ती आता वाढवण्यात आली आहे.
आधार-पॅनकार्ड लिंक केलं नसेल तर घाबरू नका; प्राप्तिकर विभागानं दिली मुदतवाढ - Finance Ministry news
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता या ३१ मार्च २०२० पर्यंत नागरिकांना आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येणार आहे.
![आधार-पॅनकार्ड लिंक केलं नसेल तर घाबरू नका; प्राप्तिकर विभागानं दिली मुदतवाढ आधार- पॅनकार्ड लिंक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5546027-631-5546027-1577761321643.jpg)
आधार- पॅनकार्ड लिंक
हेही वाचा-वाद घालणे अन् भिंती रंगवण्याचे काम आम्हाला राहिले नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आत्तापर्यंत आठ वेळा आधार पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. यासंबधीची माहिती कर विभागाने ट्विटरद्वारे दिली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड योजना संवैधानिक दृष्ट्या वैध असल्याचा निर्णय दिला होता. आधार बायोमॅट्रिक आयडी प्राप्तिकर भरताना आणि पॅनकार्ड देताना अनिवार्य असल्याचा निर्णय दिला होता.
Last Updated : Dec 31, 2019, 9:20 AM IST