नवी दिल्ली - कोरोनामुळे अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काल(मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी त्या आर्थिक पॅकेजमधली तरतुदींची क्षेत्रनिहाय माहिती देण्याची शक्यता आहे. भारताला स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध क्षेत्रांना काय मदत जाहीर केल्या जातील याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -पंतप्रधानांनी फक्त हेडलाईन दिली, बाकी पानं रिकामंच : चिदंबरम यांचा मोदींवर निशाणा
देशभरामध्ये कोरोनाच कहर अजूनही सुरूच आहे. मागील २४ तासांत देशात १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्याबरोबरच अर्थव्यवस्था सावरण्याचे दुहेरी आव्हान सरकारपुढे आहे. दरम्यान आज शेअर बाजारात सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. लॉकडाऊन चार नव्या नियमांसह लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही मोदींनी काल सांगितले.