भोजपूर - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले. शाहपूर विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांच्या समर्थकांदरम्यान मारहाण झाल्याची घटना घडली. यात अनेक जण जखमी झाले. आरजेडी उमेदवार राहुल तिवारी उर्फ मंटू तिवारी यांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याचे एका जखमी व्यक्तीने सांगितले.
बडहरामधील राजद आमदार सरोज यादव यांच्या गाडीवर स्थानिकांनी हल्ला केला. यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. यादव यांनी या हल्लेखोरांमध्ये भाजपा कार्यकर्ते सामील असल्याचा आरोप केला आहे.