बंगळुरू - लोकांमध्ये प्लास्टिकविरोधी जनजागृती व्हावी यासाठी कर्नाटकच्या विजयपुरामधील इंदिरा कँटीनने एक नामी शक्कल लढवली आहे. या कँटीनमध्ये प्लास्टिकच्या चार बाटल्या घेऊन गेल्यास, त्याच्या बदल्यात एक कप चहा दिला जातो. लोकांनी प्लास्टिकचा कचरा इतरत्र फेकू नये यासाठी शहर प्रशासनाने ही युक्ती अंमलात आणली आहे. यामुळे लोक कचरा तर पसरवत नाहीतच, मात्र, शहरातील सिंगल यूज प्लास्टिकचा वापरही कमी झाला आहे.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक बाटल्यांच्या बदल्यात इथे मिळतो चहा.. - कर्नाटक प्लास्टिक बंदी
कर्नाटकच्या विजयपुरामधील इंदिरा कँटीनने लोकांमध्ये प्लास्टिकविरोधी जनजागृती व्हावी यासाठी नामी शक्कल लढवली आहे. या कँटीनमध्ये प्लास्टिकच्या चार बाटल्या घेऊन गेल्यास, त्याच्या बदल्यात एक कप चहा दिला जातो. या गोळा केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कँटीनमधून बागलकोट येथील जे. के. सिमेंट फॅक्टरीमध्ये पाठवल्या जातात.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक बाटल्यांच्या बदल्यात इथे मिळतो चहा..
या गोळा केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कँटीनमधून बागलकोट येथील जे. के. सिमेंट फॅक्टरीमध्ये पाठवल्या जातात. तिथे त्या सिंमेंटमध्ये मिसळल्या जातात, ज्यामुळे सिमेंटच्या दर्जामध्ये सुधारणा होते. पालिका प्रशासनाने नुकतेच घाऊक आणि ठोक विक्रेत्यांकडून जवळपास १४ टन प्लास्टिक गोळा केले. अशाच प्रकारे शहरातून जवळपास ४०० किलो प्लास्टिक गोळा गेले जात आहे.
हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक: घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा जमा करतोय इलेक्ट्र्रिकल इंजीनिअर