हैदराबाद- भारतात मंगळवारी 53 हजार 601 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्या 22 लाख 68 हजार 675 वर पोहोचली आहे. 15 लाख 83 हजार 490 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. देशभरात कोरोनामुळे 45 हजार 257 रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या देशात 6 लाख 39 हजार 929 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली.
इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या माहितीनुसार 6 लाख 98 हजार 290 नमुन्यांची तपासणी सोमवारी करण्यात आली. एकूण 2.52 कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर पहिल्यांदाच 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले. देशातील कोरोना मृत्यूदर 1.99 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 69.80 टक्क्यांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 553 झाली आहे. तामिळनाडू राज्यात मंगळवारी 5 हजार 834 कोरोना रुग्ण आढळले. 6 हजार 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तामिळनाडूमध्ये दिवसभरात 118 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 8 हजार 649 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात 11 हजार 88 नवे कोरोनाबाधित
राज्यात मंगळवारी 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 68 हजार 435 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 68.79 टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात 11 हजार 88 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 553 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात मंगळवारी 256 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.42 टक्के एवढा आहे.
दिल्लीत मंगळवारी 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू
देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये मंगळवारी 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे दिवसभरात मृत्यू झालेल्यांची संख्या 10 च्या खाली येण्याची दोन महिन्यातील ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी 1 हजार 257 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी महत्वाची आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
तामिळनाडूला केंद्राकडून 512.64 कोटी रुपयांची मदत