नवी दिल्ली- भाजपचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमला देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (डीडीसीए) केली आहे.
फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचे नाव
भाजपचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमला देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने केली आहे.
अरुण जेटली दिल्ली आणि जिल्हा संघटनेचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे नाव स्टेडियमला देणे याच्यापेक्षा काय चांगले असू शकते. अरुण जेटलींच्या सहभाग आणि प्रोत्साहनाने विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशीष नेहरा, ऋषभ पंत आणि इतर अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने देशाला गौरवान्वित केले आहे, अशी प्रतिक्रिया डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दिली आहे. 12 सप्टेंबरच्या नामकरण सोहळ्यात फिरोज शाह कोटला स्टेडिमला अरुण जेटलींचे नाव देण्यात येणार आहे.
अरुण जेटली यांचे शनिवारी (24 ऑगस्ट) निधन झाले. दरम्यान दिल्लीतील यमुना क्रीडा संकुलाचे नाव बदलून त्याला अरुण जेटली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने केली होती.