नवी दिल्ली / गाझियाबाद - गाझियाबादमध्ये राहणाऱ्या महिला शिक्षिकेने मृत्यूनंतरही अनेकांना नवीन आयुष्याचा प्रकाश दिला. तसेच, या महिला शिक्षिकेने आणि तिच्या कुटुंबाने धार्मिक बंधुतेचे एक उदाहरणही ठेवले. रफत परवीन (वय 41) असे या मुस्लीम शिक्षिकेचे नाव असून त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी देहातील अवयव गरजूंना दान केले.
२ जणांना मिळाली दृष्टी, इतरांना जीवनदान
अलीकडेच त्या गाझियाबादमधील त्यांच्या कुटुंबीयांकडे आल्या होत्या. 19 डिसेंबरला रफत यांना तीव्र डोकेदुखी सुरू झाली आणि त्यांना वैशालीच्या मॅक्स रुग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. अवयवदानाचा निर्णय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनीही यासंदर्भात संमती दर्शवत रफत यांचे अवयव मृत्यूनंतर दान करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा -मुदत संपलेल्या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता वाढवण्याचा निर्णय, 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
मॅक्स रुग्णालयाच्या डॉ. निधी यांच्या मते, रफत यांच्या निधनानंतर त्यांचे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय अशा गरजू लोकांना उपयुक्त ठरले ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्याच्या डोळ्यांनी 2 लोकांना जीवनाचा नवीन प्रकाश दिला.