राजसमंद (राजस्थान) - जिल्ह्याच्या देलवाडा तहसील अंतर्गत येणाऱ्या बरवालिया गावात शनिवारी सकाळी एका बिबट्याचा मृत्यू झाला. देलवाडाहून बरवालियाला जाणाऱ्या मार्गानजिक शेतात बिबट्या तडफडत पडला असल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या काहींना दिसले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.
राजस्थान : बरवालिया गावात मादी बिबट्याचा मृत्यू - बिबट्याचा मृत्यू राजस्थान
वनविभागाशी संपर्क केल्यानंतर काहीच वेळात बिबट्याचा मृत्यू झाल्याचे लोकांचे म्हणणे होते. दोन वर्षीय मादी जातीचा हा बिबट्या असून आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक हरिसिंह झाला आणि बाबुलाल गमोती घटनास्थळी दाखल झाले. लोकांना दूर करून त्यांनी सर्वांना सुरक्षित स्थळी थांबण्यास सांगितले. मात्र, बिबट्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. वनविभागाशी संपर्क केल्यानंतर काहीच वेळात बिबट्याचा मृत्यू झाल्याचे लोकांचे म्हणणे होते. दोन वर्षीय मादी जातीचा हा बिबट्या असून आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
यानंतर कर्मचाऱ्यांकडून बिबट्याला जीपमध्ये घालून शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.