महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरेगाव-भीमा प्रकरण : फादर स्टॅन यांना रांचीमधून अटक; एनआयएची कारवाई - फादर स्टॅन यांना अटक

फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडच्या रांचीमधून राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. फादर स्टॅन हे झारखंडमधील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकांसाठी कार्य करीत आहेत.

फादर स्टॅन
फादर स्टॅन

By

Published : Oct 9, 2020, 12:12 PM IST

रांची - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडच्या रांचीमधून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये सहभागी झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फादर स्टॅन यांच्या अटकेचा झारखंड जनाधिकार महासभाने विरोध केला आहे. महासभेकडून फादर स्टॅन यांच्या अटकेची माहिती सर्वांत अगोदर देण्यात आली.

फादर स्टॅन यांना रांचीमधून अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने नामकुम स्टेशन हद्दीत असलेल्या निवासस्थानातून फादर स्टॅन यांना ताब्यात घेतले. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली. आज (शुक्रवारी) स्वामी यांना एनआयए न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी 6 ऑगस्टलाही एनआयएकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच 28 ऑगस्ट 2018 ला महाराष्ट्र पोलिसांनी फादर स्टॅन यांच्या खोलीची तपासणी केली होती.

फादर स्टॅन हे झारखंडमधील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकांसाठी कार्य करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details