हैदराबाद - तेलंगाणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामधील महाबूबनगरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या जुळ्या दोन मुलींना दुधामध्ये विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
जन्मदात्या बापाकडून जुळ्या दोन मुलींना दुधामध्ये विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न - मुलीला दिलं विष
जन्मदात्या बापानेच आपल्या जुळ्या दोन मुलींना दुधामध्ये विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
![जन्मदात्या बापाकडून जुळ्या दोन मुलींना दुधामध्ये विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न तेलंगणा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8676411-821-8676411-1599212986723.jpg)
तेलंगणा
जन्मदात्या बापानेच केला जुळ्यांना मुलींना ठार मारण्याचा प्रयत्न
केशावलू यांच्या पत्नीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता. दोन्ही मुली झाल्याने तो निराश झाला होता. तेव्हा त्याने दूधात कीटकनाशके टाकून ते मुलींना पाजले. त्यामुळे बाळांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती आहे.
केशावलूने दुधात कीटकनाशक मिसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. पोलिसांनी केशावलूला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.