रांची - कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. संक्रमण रोखण्यासाठी घरातून बाहेर न पडणे हाच एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना अगदी महत्त्वाच्या कार्यक्रमातही सहभागी होता येत नाही. रांची येथील हायटेंशन कॉलनीत राहणाऱ्या जितेंद्र सिंह यांच्यासोबतही असेच काही घडले आहे.
सिंह यांना ३ एप्रिलला सकाळी फोन आला. तुमची मुलगी या जगात राहली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. लवकर नवादा येथे पोहचा, असे त्यांना सांगण्यात आले. यानंतर सिंह लगेच पोलीस ठाण्यात गेले आणि मुलीच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी परवानगी मागत राहिले मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. यानंतर त्यांना उच्चस्तरावर चौकशी केली. मात्र, कोणीच त्यांच्या मदतीला आले नाही.
जितेंद्र सिंह यांना वारंवार सासरची मंडळी फोन करत होती. मात्र अर्ध्या तासात सांगतो असे म्हणत सिंह वेळ मारून नेत होते. दुपारी ४ वाजेपर्यंत सिंह यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना जाण्याची परवानगी मिळाली नाही. होळीच्या आदल्या दिवशी सिंह यांची मुलगी माहेरी आली होती आणि तिने आपल्या ४ वर्षीय मुलीला सिंह यांच्याकडे ठेवले होते, या गोष्टीचे सिंह यांना अतीव दु: ख होते.
लॉकडाऊनमुळे एक वडील आपल्या मुलीच्या अंत्यसंस्काराल उपस्थित राहू शकले नाहीत, ही खेदाची बाब आहे. मात्र, असे दुसऱ्या कोणाबरोबरही घडू नये, जितेंद्र सिंह यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे, असेही सिंह म्हणाले. लॉकडाऊन आणि कोरोनाने सिंह कुटुंबाला असा हादरा दिला जो ते कदापि विसरू शकणार नाहीत.