महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फॅसिस्टवादी लोक विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतायत - राहुल गांधी - Jawaharlal Nehru University campus

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Jan 5, 2020, 10:27 PM IST

नवी दिल्ली -जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. काही गुंडांनी विद्यापीठात घुसत जेएनयूच्या विद्यार्थीं आणि शिक्षकांना मारहाण केली आहे. या घटनेचा राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त केला आहे. 'ही घटना धक्कादायक असून फॅसिस्टवादी विचारसरणीचे लोक हे विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरत आहेत', असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.

जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर हल्ला झाला असून यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारे फॅसिस्टवादी विचारसरणीचे लोक विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरत आहेत, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजेदरम्यान काही गुंड विद्यापीठ परिसरात आले. त्यांनी विद्यापीठ वसतिगृहाच्या दिशेने दगडफेक करत तोडफोड केली, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दोन्ही संघटनांनी एकमेकांवर दोषारोप केले आहेत. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष आणि अन्य अनेक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details