महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'शाह म्हणतात ३०० दहशतवादी मारले, मग पुरावे कुठे आहेत'

भारताने केलेल्या हल्ल्यात ३०० दहशतवादी ठार झाले, असे अमित शाह म्हणत आहेत. तर त्यांनी पुरावे देऊन आपले म्हणणे मांडावे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

फारुख अब्दुल्ला

By

Published : Mar 6, 2019, 10:49 PM IST

नवी दिल्ली - भारताने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यातील मृतांची आकडेवारी सांगणाऱ्या अमित शाहंना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी प्रश्न केला आहे. शाह यांनी याबाबतचे पुरावे द्यावेत, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने २६ फेब्रुवारीला पाकच्या बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता.

भारताने केलेल्या हल्ल्यात ३०० दहशतवादी ठार झाले, असे अमित शाह म्हणत आहेत. तर त्यांनी पुरावे देऊन आपले म्हणणे मांडावे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात अब्दुल्ला बोलत होते. जेव्हा सरकारकडे याविषयी पुरावे मागितले जातात. तर ते (सरकार) तुम्हाला देशद्रोही ठरवतात, असेही अब्दुल्ला म्हणाले.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. यात सीआरपीफच्या ४० जवानांना वीरमरण आले होते. यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला केला.

ABOUT THE AUTHOR

...view details