महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंदोलन आणखी तीव्र होणार; केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा कार्यालयांना शेतकरी घालणार घेराव

शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेले आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता शेतकऱ्यांनी दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गवरिल वाहतूक ठप्प करण्याचा इशारा दिला आहे. तसेच १४ डिसेंबरला शेतकरी भाजपा मंत्री आणि पार्टीच्या कार्यालयांना घेराव घालणार आहेत.

By

Published : Dec 12, 2020, 7:11 AM IST

farmers protest against three farm laws live updates
आंदोलन आणखी तीव्र होणार; केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा कार्यालयांना शेतकरी घालणार घेराव

नई दिल्ली - कृषी कायदे मागे घेतले जावेत यासाठी पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज १७ वा दिवस आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या सहा फेऱ्या पार पडल्या मात्र त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारला होता. या बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता शेतकऱ्यांनी दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गवरिल वाहतूक ठप्प करण्याचा इशारा दिला आहे. तसेच १४ डिसेंबरला शेतकरी भाजपा मंत्री आणि पार्टीच्या कार्यालयांना घेराव घालणार आहेत.

सरकारने कायद्यात सुधारणा करण्यासंबंधीचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला. मात्र शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव धुडकावत लावत कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली. आता शेतकऱ्यांनी आज दिल्ली-आग्रा एक्सप्रेस हायवे बंद करण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. तसेच हे आंदोलन तीव्र करत १४ डिसेंबरला देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शेतकरी नेते शिव कुमार कक्का यांनी सांगितलं की, सरकारने दिलेल्या प्रस्तावामध्ये काही नवीन नाही. यामुळे आम्ही सर्वांनी त्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही.

शेतकरी नेत्यांनी सरकारने बिनकामाचा प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याची भावना देखील शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली. याशिवाय त्यांनी सरकारने आणखी नवा प्रस्ताव ठेवल्यास त्यावर आम्ही विचार करू, असे देखील सांगितले. आता १४ डिसेंबर रोजी शेतकरी भाजपा मंत्री, पार्टीचे जिल्हा कार्यालयांना घेराव घालणार आहेत.

हेही वाचा -जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी

हेही वाचा -दिल्ली सरकारच्या माहिती आणि सुचना विभागाचे उपसंचालक बेपत्ता

ABOUT THE AUTHOR

...view details