नवी दिल्ली - मेरठमधील सैदपूर गावातील शेतकरी पदयात्रा करत गाझियाबादमधील गोविंदपूरम येथे पोहोचले आहेत. सर्व शेतकरी शहरातील धान्य बाजारजवळ एकत्र झाले असून त्यांना भारतीय किसान यूनियन (बलराज)चेही सहकार्य मिळाले आहे. एन-एच 9 दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे तयार करताना, सरकारने मेरठ आणि गाझियाबादमधील 25 गावातील जमिनीचे अधिग्रहण केले होते. मात्र, सरकारने नुकसानभरपाईची रक्कम वेगवेगळी दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना एकसमान रक्कम मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
गाझियाबाद : जमीन अधिग्रहणाची रक्कम एकसमान मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे अंदोलन - गाजियाबादमध्ये शेतकऱ्यांचे अंदोलन
गेल्या वर्षापासून 25 गावातील शेतकरी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अंदोलन करत आहेत. मात्र, सरकारकडून त्यांना नेहमीच आश्वासन देण्यात आली आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांची जिल्हा मुख्यालयाला घेराव घालण्याची योजना होती.
गेल्या वर्षापासून 25 गावातील शेतकरी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अंदोलन करत आहेत. मात्र, सरकारकडून त्यांना नेहमीच आश्वासन देण्यात आली आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांची जिल्हा मुख्यालयाला घेराव घालण्याची योजना होती. मात्र, शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी विनंती अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (शहर) शैलेंद्र कुमार सिंह यांनी केली होती. त्यानुसार आज शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र अंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, आज शेतकऱ्यांशी संबधित तीन अध्यादेशांचा विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीय किसान महासंघाकडून दिल्लीतील जंतर-मंतर समोर अंदोलन करण्यात आले आहे. या अंदोलनामध्ये मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता.