महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेश : मालकाने श्वानाच्या नावे केली पन्नास टक्के संपत्ती - श्वानाच्या नावे केली पन्नास टक्के संपत्ती

सर्वात निष्ठावान प्राणी म्हटल्यांवर श्वान हेच नाव सर्वात आघाडीवर असतं. मध्य प्रदेशमधील छिंदवाडाच्या बाडीवाडा या गावातील एका शेतकऱ्यांने आपल्या पन्नास टक्के मालमत्तेचा हक्क श्वानला दिला. यासाठी त्यांनी कायदेशीर मृत्यूपत्र तयार केले.

श्वान
श्वान

By

Published : Dec 30, 2020, 2:23 PM IST

छिंदवाडा - आपण इट्स एटंरटेनमेंट या चित्रपटात एका श्वानाच्या नावे सर्व संपत्ती असल्याचं पाहिलं आहे. मात्र, प्रत्यक्षातही असं घडलं आहे. सर्वात निष्ठावान प्राणी म्हटल्यांवर श्वान हेच नाव सर्वात आघाडीवर असतं. मध्य प्रदेशमधील छिंदवाडाच्या बाडीवाडा या गावातील एका शेतकऱ्याने आपल्या पन्नास टक्के मालमत्तेचा हक्क श्वानाला दिला. तर उर्वरीत पन्नास टक्के संपत्ती दुसऱ्या पत्नीच्या नावावर केली आहे.

मालकाने श्वानाच्या नावे केली पन्नास टक्के संपत्ती

संबधित शेतकऱ्याचे नाव ओम नारायण वर्मा आहे. आपल्या मुलाच्या वागण्यावर ओम नारायण वर्मा संतापले होते. ज्यामुळे त्यांनी आपल्या मुलाऐवजी पाळीव श्वानाच्या आणि पत्नीच्या नावावर आपली संपत्ती केली. यासाठी त्यांनी कायदेशीर मृत्यूपत्र तयार केले.

'माझी पत्नी आणि पाळीव श्वान माझी सेवा करतात. मला ते सर्वात प्रिय आहेत. माझ्या मृत्यूनंतर, मी संपूर्ण मालमत्ता त्या दोघांना देतो. त्यांच्या पत्नीचे नाव चंपा वर्मा आणि श्वानाचे नाव ज‌ॅकी आहे. त्यांच्या मृत्यूनंतर श्वानाचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीला त्याची संपत्ती मिळेल.

ओम वर्मा यांच्याकडे 18 एकर जमीन -

ओम वर्मा यांना दोन बायका आहेत. त्याचे दोनदा लग्न झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पहिली पत्नी धनवंती वर्मा असून त्यांच्यापासून ओम वर्माला तीन मुली आणि एक मुलगा आहे. तर दुसरी पत्नी चंपा वर्मा असून त्यांना दोन मुली आहेत. ओम वर्मा यांच्याकडे 18 एकर जमीन आहे. तसेच इतरही गुंतवणूक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details