नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून चर्चा नको तर कायदे रद्द करा, असा नारा आंदोलकांनी दिला आहे. तर अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारने तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा आपला प्रस्ताव शेतकरी संघटनांकडे सुपूर्द केला आहे. मात्र, हे संशोधन बऱ्याच शेतकऱ्यांनी नाकारले आहे. कायदे रद्द करावे. तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असे शेतकरी संघटनेचे नेता बूटा सिंह म्हणाले. आम्हाला तुरुंगात जावं लागलं. तरी चालेल, मात्र, कायद्यांना रद्द केल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
गेल्या 17 सप्टेंबरला कृषी विधयेक पास झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्यांचे कायद्यात रुपांतर झाले. या कायदाच्या विरोधात पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन केले. सरकार आंदोलनाला गांभीर्याने घेत नसल्याने शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली. मात्र, सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवलं आहे. शेतकऱ्यांना मागे हटविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. हे आंदोलन फक्त पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन नसून संपूर्ण देशाचे आंदोलन झाले आहे.
शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा -