महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलन : आणखी एकाचा मृत्यू; ३४ पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी गमावला जीव

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा बळीही गेला आहे. आज आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

By

Published : Jan 2, 2021, 1:01 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पास केलेले तीन कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा बळीही गेला आहे. आज आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. युपी गेटवर स्थित शौचालयामध्ये एका शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

कश्मीर सिंह असे संबधित शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काश्मीर सिंहचा मृतदेह शौचालयातून बाहेर काढला. कश्मीर सिंह यांचे वय जवळपास 70 वर्ष असल्याचा अंदाज आहे. त्याच्या जवळ एक सुसाइड नोट ही पोलिसांना मिळाली आहे. ज्या ठिकाणी मी शरीर सोडले आहे. त्याच ठिकाणी माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे सुसाइड नोटमध्ये लिहलेलं आहे.

आतापर्यंत 34 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू -

शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 34 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघात, आजार आणि थंडीमुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश असल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले. 40 मुख्य शेतकरी संघटना आणि सुमारे 500 इतर शेतकरी संघटनांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर एक महिन्यापासून बसून आहेत.

38 दिवसांपासून आंदोलन सुरू -

शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या 38 दिवसांपासून सुरू आहे. आंदोलक दिल्लीच्या सिमेवर कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. टिकरी, सिंघू, गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 30 डिसेंबरला शेतकऱ्यांनी केंद्र सरकारसोबत चर्चा केली होती. त्यात काही गोष्टींवर सहमती झाल्याची माहिती आहे. आता चर्चेची पुढील फेरी 4 जानेवरीला होणार आहे. यामध्ये कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपी या विषयावर चर्चा होईल. चर्चेतून सकारात्मक परिणाम न आल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असे शेतकरी नेते युद्धवीर सिंह म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details