महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शुक्रवारी दुपारी ओडिशा किनारपट्टीवर धडकणार 'फनी'; हाय अलर्ट जारी - Odisha

वादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन ओडिशा प्रशासनाने शुक्रवारी किनारपट्टी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Fani

By

Published : May 2, 2019, 8:05 PM IST

भुबनेश्वर - फनी चक्रीवादळ शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळीच किनारपट्टीवर धडकणार होते. मात्र, हवेच्या दाबाच्या परिणामामुळे वादळाच्या गतीत बदल झाला होता.


वादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन ओडिशा प्रशासनाने शुक्रवारी किनारपट्टी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर विमान प्राधिकरणांना सावधानतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री सुरेश गोयल यांनीही फनी चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.


आंध्रप्रदेशात किनारपट्टी भागातील श्रीकुलम येथे आज सकाळफासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. तर, त्यांच्यासाठी गरजेच्या सर्व वस्तुंची उपब्धतात करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनीही उच्च स्तरीय बेठक घेऊन चक्रीवादळाच्या परिणामांचा आणि व्यवस्थेचा आज आढावा घेतला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details