भुवनेश्वर -'फनी' चक्रीवादळाने आज सकाळीच ओडिशाच्या किनारपट्टीवर धडक दिली. त्यावेळी वाऱ्याची गती १७५ किमी प्रति तास होती. दरम्यान वादळग्रस्त परिसरात मुसळधार पावसानेही हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तर, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागातही जोरदार वाऱ्याचा तडाका बसला आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक किनारपट्टी भागात तैनात करण्यात आले होते.
किनारपट्टी भागात फनीचा कहर भुवनेश्वरहून उडणारे सर्वच विमान गुरुवारपासून रद्द करण्यात आले आहेत. तर, कोलकाता विमानतळ रात्री ९.३० ते शुक्रवारी ६.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर, जवळपास २०० विमान सेवा बंद करण्यात आली आहे. ओडिशाहून ११ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. त्यामध्ये ६९१ गर्भवती महिलांचा समावेश आहे. तर, राज्यभरात २४ तासांसाठी घराबाहेर निघू नये असा इशारा देण्यात आला आहे.
रेल्वेचे आपातकालीन क्रमांक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेल्या लोकांसाठी जवळपास ५ हजार स्वयंपाक गृहांची स्थापना करण्यात आली आहे. वादळाच्या वेळी येथून त्यांच्या अन्नाजी गरज भागवली जाणार. गंजम, खुरदा, रुपी आणि जगतसिंगपूर येथील आकाशामध्ये मोठ्या प्रमाणत विजा कडाडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या विजा जमीनीपासून ५ फुट पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तेथील सुरक्षेवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भुबनेश्वरमध्ये गरजेच्या वस्तूंनी अनेक ट्रक भरून ठेवण्यात आले आहेत. आपातकालीन स्थितीत त्यांचा उपयोग करण्यात येईल. तर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक सर्व परिस्थिती स्वतःहून हाताळत आहेत.
समुद्र किनाऱ्याहून परतताना मच्छिमार पूर्व दक्षिणेकडे जाणारी रेल्वे वाहतुक वादळामुळे ठप्प झाली आहे. जवळपास १४७ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये फसलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी गुरुवारी ३ विशेष रेल्वेंची व्यवस्था करण्यात आली होती.