आगरतळा - भारतीय हवाई दलाने ११ हेलिकॉप्टर्स आणि अॅन-३२ ही ४ एअरक्राफ्टस विविध ठिकाणच्या बचावकार्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. शिलाँगमधील ईस्टर्न एअर कमांड मुख्यालयाने ही माहिती दिली. यातील ६ लाईट हेलिकॉप्टर्स बचावकार्य करतील. तर, ५ मीडिअम लिफ्ट हेलिकॉप्टर्स बचावकार्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करतील.
फनी चक्रीवादळ : हवाई दलाचे ११ चॉपर्स, ४ एअरक्राफ्टस बचावकार्यासाठी सेवेत
ही हेलिकॉप्टर्स ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील विविध राज्यांत बचावकार्यासाठी बागडोग्रा, पूर्णिया, कुंभीग्राम (सिलचर आणि दक्षिण आसाम) येथे तयार ठेवण्यात आली आहेत.
हवाई दलाची ४ एअरक्राफ्टस बचावकार्यासाठी आवश्यक वस्तूंची, वैद्यकीय सुविधांची आणि एनडीआरएफ पथकांची (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) त्यांच्या बचाव साहित्यासह वाहतूक करतील. ही हेलिकॉप्टर्स ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील विविध राज्यांत बचावकार्यासाठी बागडोग्रा, पूर्णिया, कुंभीग्राम (सिलचर आणि दक्षिण आसाम) येथे तयार ठेवण्यात आली आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) संचालक दिलीप साहा यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी आणि रविवारी फानीचा ईशान्येकडील विविध राज्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ शनिवारी बांग्लादेशकडे सरकेल.