नवी दिल्ली -बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर बुधवारी सायंकाळी दिल्लीतील भाजप कार्यालयात (भारतीय जनता पार्टी, मुख्यालय) विजयी उत्सव आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भाजपा कार्यालयात उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली. कुटुंब केंद्रीत असलेले अनेक पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. मात्र, 'सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विश्वास', हा भाजपाचा एकमात्र मंत्र आहे, असे ते म्हणाले.
कौटुंबिक पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. दुर्दैवाने, कित्येक दशकांपासून, देशाचे नेतृत्व करणारा एक पक्ष कुटुंब केंद्रीत बनला आहे. अशा परिस्थितीत भाजपाची जबाबदारी वाढते. आपल्याला पक्षात लोकशाही कायम ठेऊन एक उत्तम उदाहरण उभे करायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
विकास हेच विजयाचे केंद्र -