लखनौ - उन्नाव अत्याचार प्रकरणातील मृत पीडितेवर आज अंत्यसंस्कार होणार आहे. पीडितेचे कुटुंब अत्यंसंस्कार करण्यासाठी तयार झाले आहे. पीडितेचा मृतदेह काल (शनिवारी) सायंकाळी उन्नावला आणण्यात आला होता. मात्र, कुटुंबाने विरोध केल्याने अंत्यसंसस्कार राहिले होते.
उन्नाव प्रकरण : पीडितेवर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार
उन्नाव अत्याचार प्रकरणातील मृत पीडितेवर आज अंत्यसंस्कार होणार आहे. पीडितेचे कुटुंब अत्यंसंस्कार करण्यासाठी तयार झाले आहे. पीडितेचा मृतदेह काल (शनिवारी) सायंकाळी उन्नावला आणण्यात आला होता. मात्र, कुटुंबाने विरोध केल्याने अंत्यसंसस्कार राहिले होते.
थोड्याच वेळात उन्नाव अत्याचार घटनेत मृत्यू झालेल्या पीडितेवर अंत्यसंस्कार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
शुक्रवारी उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात पेटवून दिलेल्या पीडितेची अखेर मृत्यूशी झुंज संपली. दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. त्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ईतर नेते दिल्ली विधानभवनासमोर धरणे प्रदर्शने केली होती. या घटनेनंतर अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण होते.