नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सलग चौथ्या दिवशीही घट झाली आहे. तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोलच्या भावात ६ पैशांची तर डिझेलच्या दरात ९ पैसे प्रति लीटरची कपात केली आहे. ही कपात जास्त नसली तरी दिलासादायक आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशीही कपात, जाणून घ्या आजचे दर - petrol
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळेच भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण होत आहे.
![पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशीही कपात, जाणून घ्या आजचे दर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3574377-thumbnail-3x2-oil.jpg)
अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गेल्या पंधरा दिवसांपासून मर्यादीत राहिलेल्या आहे. गेल्या १५ दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती ६० डॉलर ते ६३ डॉलर प्रति बॅरलदरम्यान राहिल्या आहेत. त्याआधीच्या पंधरवाड्यात कच्च्या तेलाचे दर ६४ डॉलर ते ७३ डॉलर प्रति बॅरलच्या घरात होते. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरत्या किंमतींमुळेच भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण होत आहे.
२९ मेनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत १.९३ रुपये प्रति लीटरची घट झाली. तर डिझेलच्या किंमतीतही ग्राहकांना २.८५ रुपये प्रति लीटरचा दिलासा मिळाला.