हैदराबाद - तामिळनाडूमधील नामक्कल जिल्ह्यात एकमेकिंशी समलैंगिक संबंध असलेल्या दोन महिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या संबधांवर आक्षेप घेतल्याने समलिंगी जोडीने गळफास लावून आत्महत्या केली. दोघींपैकी एकीला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले गेल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
कीर्ती (नाव बदलले आहे) आणि स्वेथा (नाव बदलले आहे) या दोघी पॉवरलूम कार्यशाळेमध्ये एकत्र काम करत होत्या, अशी माहिती आहे. कीर्तीचे (वय 23) आधीपासूनच एका पुरुषाशी लग्न झाले होते आणि तिला तीन वर्षाचे मूलही होते.