महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स अॅप डाऊन, डाऊनलोडिंग बंद

व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचे अनेकांनी ट्विटरवरून सांगितले आहे. काही ठिकाणी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची खिल्ली उडवली जात आहे. या तिन्हींची मालकी असलेल्या फेसबुकने मात्र अद्यापपर्यंत यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

By

Published : Jul 3, 2019, 11:17 PM IST

डाऊन

नवी दिल्ली - सोशल मिडियावर सर्वात जास्त वापर असणारे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आज दुपारपासूनच जगभरात डाऊन झाले आहेत. विशेषत: युरोप व अमेरिकेत हे जास्त प्रमाणत जाणवत आहे. व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचे अनेकांनी ट्विटरवरून सांगितले आहे. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक ही तिन्ही एकाच वेळी मंद झाल्याने युजर्सची अडचण झाली आहे.

काही ठिकाणी तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान, या तिन्ही प्लॅटफॉर्मवर लोकांना अडचणी येत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या अडचणींचा सामना केलेल्या ८२ टक्के वापरकर्त्यांचे इन्स्टाग्रामवर म्हणणे आहे की, माहिती टाकण्यासाठी अडचण येत आहे. ११ टक्के वापरकर्त्यांना वेबसाइटसाठी तर सहा टक्के जणांना लॉग इनसाठी अडचण येत आहे. या तिन्हींची मालकी असलेल्या फेसबुकने मात्र अद्यापपर्यंत यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details